मौन....
प्रत्येकवेळी शब्द असावेच
अस नसत काही..
शब्दांना मौनात ठेऊन
नजरच जाते बोलून काही
प्रत्येक वेळी घट्ट मिठी मारावी
अस नसत काही...
कधी कधी ओझरते स्पर्श सुद्धा
सांगून जातात बरंच काही...
तू नेहमीच असावीस जवळ
अस नसत ग काही...
डोळे मिटल्यावर सुद्धा तू दिसतेस
हेच सांगून जात बरंच काही..
प्रत्येकवेळी लव्ह यू म्हणावं
अस नसत ग काही...
कधी कधी ओठांची फक्त थरथर
सांगून जाते बरंच काही....
मिस यू अस म्हणावंच
अस नसत ग काही
तुझ्या डोळ्यातील पाणीच
सांगून जात बरंच काही
भर भरून बोलतच राहावं
अस नसत काही....
मिटलेले ओठच कधीतरी
बोलून जातात बरंच काही
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment