तुझ्या फुटपट्टीने...
आयुष्य माझं का मोजू
अन का प्रत्येक वेळी
तुझ्यासाठीच मी सजू?
निकष तुझे सौन्दर्याचे
मी माझे का मानावे?
का तुझ्या नजरेत मी
माझे मला तोलावे...?
असेन मी सावळी
तुला काय त्याचे?
गोरेच पाहिजे दिसले
असे थोडेच आहे?
सोडेन केस मोकळे
मर्जी माझीच आहे
स्वामिनी माझीच मी
काया माझीच आहे..
परिधान काय करावे
चॉइस माझाच आहे
पाप तुझ्या नजरेत
दोष माझा काय आहे?
मी न तुझी चिमणी
घरट्यात चिवचिवणारी
मी घार फिरते नभांगणी
परी चित्त माझे पिलांशी
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment