सांगणे तुला आता काहीच नाही
विरघळलो ग तुझ्यात आता..
अस्तित्व वेगळे काहीच नाही...
प्रेमात अट काहीच नाही
शर्तीवर प्रेम मी केलेच नाही
तुझ्याशिवाय मन माझे..
कुणावर जडलेच नाही....
हरवलो तुझ्यात म्हणणार नाही
माझाच मला मी सापडत नाही
हरवणे आणि गवसणे कसले
आता काही कळतच नाही..
आरशात माझा मी दिसतच नाही
तुझ्यावाचून काही उमगतच नाही
चेहरे तुझे सगळीकडे का ते
अद्याप मजला कळले नाही..
जरी चुकीला माफी नाही..
तरी मी सखे गुन्हेगार नाही..
शिक्षा कोणत्या गुन्ह्याची ते
अद्याप मजला कळले नाही...
मिळवायचे आता काही नाही
गमवायला काही उरलेच नाही..
प्रश्नपत्रिका माझ्याच आयुष्याची
अद्याप मजला सुटलीच नाही
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment