आला झिम्माड गारवा
आता विझून गेला ग
मना- मनातला वणवा...
आला वळीव वळीव
गेला आभाळी पाचोळा
पार ढगापाशी पोचला
भुईवरला ग धुरळा
आला वळीव वळीव
झाली पाखरं सैरभर
झाला चावट ग वारा
उडवी झाडांचे पदर
आला वळीव वळीव
आले आभाळ भरून
झाल्या ढगांच्या पखाली
खाली आल्या ओथंबून
आला वळीव वळीव
बघ विजेचा नखरा
जशी वयातली पोर
मारते चकरावर चकरा
आला वळीव वळीव
माती झाली ग सुगंधी
जसा अत्तराचा फाया
त्याची वेगळीच धुंदी
आला वळीव वळीव
आता होईल ग रुजवा
माती होईल गर्भार
तिचा पाळणा सजवा..
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment