नकोस करू प्रेम माझ्यावर
पण माझं तुझ्यावर आहे ना...
तुझ्याही मनात आत कुठेतरी
थोडा मी खास आहेच ना...
शब्दांत व्यक्त नकोच करू ..
मौनातच प्रेम बोलते ना
नजर बोलते किती तुझी
अग, तुला तरी कळते ना....
नकाराचा निर्धार तुझा
व्यर्थ किती तुझ्या वल्गना
पण एकांतात माझ्यासाठी
डोळे तुझे भरतात ना....
भरलेले डोळे मग,
तू अलगद पुसतेस ना
मग एकटीच खुळ्यागत
गालात हलके हसतेस ना
तू ही करावे प्रेम मजवर
हट्ट माझा मुळीच ना...
असे जपावे अलगद तुला
की मलाही ते कळावेच ना
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment