Ad

Saturday, 17 August 2019

न्यूट्रल

उन्हाची सवय असली की
सावलीवाचून अडत नाही
भिजायची सवय असली..
उबेची गरज पडत नाही...

दोन्ही हात उंचावून
आपणच बोलवावे वादळाला
एकदा का ते माणसात आलं
की त्याचंही काही वाटत नाही

सावल्याच असतात बेईमान
सवय त्यांची भलतीच अवघड
कितीही जीव लावला तरी
तिला काही फरक पडत नाही

क्षणांत हसणे क्षणांत रडणे
आता काही सोसवत नाही...
आता कुणाचे ओले डोळे,
काळीज ओले करत नाहीत

देता देता इतके दिले की,
जवळ काही उरलेच नाही..
आत्ता तुझ्याजवळ मागावे
असे काही वाटतच नाही..

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...