आवड...
आवडत्या माणसाचा शोध
कधीच संपत नाही...
एकदा आवडून घेतलं की
फार शोधावं लागत नाही
आवडणारी कुणी भेटेलही
पण तिला आपण आवडू का
तिला आपण आवडलो तरी
ती आपल्याला आवडेल का?
आवडणाऱ्या व्यक्तीचं,
सारंच आपल्याला आवडतं
नावडणाऱ्या व्यक्तीचं
मीठ देखील अळणी असतं
आपण आवडावे जगाला
हा सोस कशासाठी?
अन आवडीचे भेटावे कुणी
ही हौस कशासाठी?
आवडी निवडीच्या या खेळाला
मुळात कधी अंत नाही...
आवडावे सगळ्या जगाला,
असे आपण कोणी संत नाही
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment