Ad

Wednesday, 14 August 2019

शहाणी वळणे

शहाणी वळणे

वळून बघता मागे...
दिसती शहाणी वळणे
आयुष्य म्हणजे काय ते
आता चालू झाले  कळणे

कधी कोणच्या वळणावर
तिचे अमाप वेड लागणे
पण पुढच्याच वळणावर..
तिचे अलविदा म्हणणे..
तेव्हाच कळले मला
काय असते ते जळणे
आयुष्य म्हणजे काय ते
आता चालू झाले ते कळणे

खचून गेलो त्या वळणावर
अन भेटले असे अवचित
कुणी पुढच्याच वळणावर...
अन कळले मला तेव्हाच
काय असते जीव लावणे
आयुष्य म्हणजे काय ते
आता चालू झाले ते कळणे

वळणे असंख्य अशी मी
बेडर पार करीत मी आलो..
कधी वेदनांचे निर्मम काटे
कधी फुले अशी वेचित आलो
किती काटे अन किती फुले?
व्यर्थ  त्याची मोजदाद करणे
आयुष्य म्हणजे काय ते
आता चालू झाले ते कळणे

वळून बघता मागे...
दिसती असंख्य वळणे
आयुष्य म्हणजे काय ते
आता चालू झाले  कळणे

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...