म्हणून तू मनसोक्त कधी,
हसूच नको बरं....
बिघडेल ना रे त्यामुळे
तुझ्या चेहऱ्याचा...
प्रोफेशनल समतोल....
कदाचित त्यामुळेच
बिघडेल तुझा इस्त्री केलेला
भलताच गोंडस चेहरा...
आणि फसतील तुझे
अनेक बिझनेस गोल..
म्हणून तू मनसोक्त कधी,
हसूच नको बरं,
बिघडेल ना रे त्यामुळे
तुझ्या चेहऱ्याचा...
प्रोफेशनल समतोल....
कार्पोरेट माणसानं,
नेहमी प्रोफेशनल हसावं
वरून उदार दिसलो तरी
आत हिशेबी असावं..
खराखुरा हसलास तर
कळेल ना रे तुझे खरेखुरे मोल
म्हणून तू मनसोक्त कधी,
हसूच नको बरं,
बिघडेल ना रे त्यामुळे
तुझ्या चेहऱ्याचा...
प्रोफेशनल समतोल....
आमचं तसं बरं आहे...
जे आत तेच बाहेर आहे
झरा निरागस हास्याचा
आत अखंड वहातो आहे
तुझं मात्र तस नाही...
तुला हसणं परवडत नाही
तुझं जगणच झालंय झोल
म्हणून तू मनसोक्त कधी,
हसूच नको बरं,
बिघडेल ना रे त्यामुळे
तुझ्या चेहऱ्याचा...
प्रोफेशनल समतोल....
म्हणून तू मनसोक्त कधी,
हसूच नको बरं, कारण
बिघडेल कदाचित त्यामुळे
तुझ्या चेहऱ्याचा...
प्रोफेशनल समतोल....
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment