हे जगणे पेच आहे...
हे जगणे एक पेच आहे
जरी जगणे रोज तेच आहे
भासते वाट ही सरळ जरी
पावलाला मात्र इथे ठेच आहे..
जे भासते सरळ अन साधे
तेच आहे एक गहिरे कोडे
जे वाटते अगम्य कोडे
तेच असते सरळ अन साधे
कळेना कुठे अन कसली
जगण्यात बोच आहे..
हे जगणे एक पेच आहे
जरी जगणे रोज तेच आहे
जे आहे कधीचे मजपाशी
ते मजला हवेच आहे...
जे न मिळे मज कधीही
ते ही मजला हवेच आहे
या अपूर्णतेची नकळे मला
कसली ही टोच आहे..
हे जगणे एक पेच आहे
जरी जगणे रोज तेच आहे
जरी जर्जर झालो तरी
मज वाटे मी अमर आहे.
वेदनांचा कल्लोळ तरी
भोगण्याचा सोस आहे
वासनेचा अजय विषाणू
जनुकातच तोच आहे..
हे जगणे एक पेच आहे
जरी जगणे रोज तेच आहे
जरी जगणे तेच आहे
जगण्यात तोच पेच आहे
इंच इंच लढतच रहाणे
खरे जगणे हेच आहे
हे जगणे एक पेच आहे
जरी जगणे रोज तेच आहे
-प्रशांत शशीकांत शेलटकर
8600583846 रत्नागिरी
No comments:
Post a Comment