Ad

Wednesday, 13 February 2019

व्हॅलेन्टाईन

व्हॅलेन्टाईन ...

आज नकार द्यायचाच
तिने केला  वज्रनिश्चय
हसऱ्या चेहऱ्यावर त्याच्या
पहायचा होता तिला पराजय

सहज एकदा जाता जाता
रस्त्यात तो दिसला होता
काळजाचा अलगद ठोका
का कोण जाणे चुकला होता
तरी पण तिने केला निश्चय
हसऱ्या चेहऱ्यावर त्याच्या
पहायचा होता तिला पराजय

सहज एकदा हाय म्हणाला
परत एकदा ठोका चुकला
मधाळ गोड गालात हसुनी
तोच तिला बाय म्हणाला..
तरी पण तिने केला निश्चय
हसऱ्या चेहऱ्यावर त्याच्या
पहायचा होता तिला पराजय

विसरावे जितके त्याला
तोच इतका आठवत गेला
नको नको म्हणत असताना
काळजात तो रुततच गेला
तरी पण तिने केला निश्चय
हसऱ्या चेहऱ्यावर त्याच्या
पहायचा होता तिला पराजय

निर्धाराने न करायचे कधी
तेच का हवेहवेसे वाटते..
त्याच्यासाठी अवचित कधी
डोळ्यामध्ये का पाणी येते?
तरी पण तिने केला निश्चय
हसऱ्या चेहऱ्यावर त्याच्या
पहायचा होता तिला पराजय

अशाच एका सांजवेळेला
अवचित तो जवळ आला
गुलाबाच्या नाजूक पाकळ्या
ओंजळीत तिच्या ठेवून गेला
आता तिचा ढळला निश्चय
कधी नव्हे ते त्याच्यासाठी
भरून आले तिचेच हृदय...

अलगद त्याचे ओठ बोलले
प्रिये तू माझे ह्रुदय चोरले...
निःशब्द झाली ती ही मग
मौन मात्र मग बोलके झाले

आज तिने दिला होकार
ढळून गेला तिचा निश्चय
मरणकळा सोसतच होतो
व्हॅलेन्टाईनचाच अखेर विजय

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...