Ad

Wednesday, 30 January 2019

ब्रेकअप झाला की ब्

ब्रेकअप झाला की

ब्रेकअप झाला की माणसं
स्टेटस मधून बोलतात
कुणी मंगेश पाडगावकर
कुणी सुरेश भट होतात..

ब्रेकअप झाला की,
डीपी हमखास बदलतो.
दिवस रात्र बिचारा
अश्रू ढाळत बसतो

ब्रेकअप झाला की,
कधी डीपीच गायब होतो
आणि स्टेटसच्या लाईनवर
केविलवाणा टिम्बच उरतो

ब्रेकअप झाला की,
एक गोष्ट नक्की होते
शेर-शायरीची टाकी
दिवसभर गळत बसते

ब्रेकअप झाला की,
सर्वच वाईट होत नाही
मेसेजची वाट बघत
रात्री जागावे लागत नाही

ब्रेकअप झाला की,
एक आवर्जून करावं
फेसबुकच्या समुद्रात
रिक्वेष्टींचं गळ टाकीत बसावे

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

Saturday, 19 January 2019

बर्फ आणि अग्नी

वयात आलेली आग एकदा
लाजत बर्फाला म्हणाली,
लग्न करशील का माझ्याशी
तुझ्यावरती प्रीती जडली..

जवानीच्या ज्वाळा माझ्या
किती अन कशा झाकू,
तुझ्यासाठी लावेन म्हणते
लाल ठिणग्यांच कुंकू...

बर्फ झाला तरी पुरुषच तो
तिला बघून पांघळला...
आगी साठी त्याचा देह
थोडा थोडा वितळला...

म्हणाला अशी दूर का
थंडी खूप लागते...
जवळ ये ना जराशी
आता का तू लाजते..

बर्फ़ाचे उबदार बोल ऐकून
अग्निराणी सुखावली..
मिठीत घेण्या बर्फाला
त्याच्याकडे  झेपावली..

तिच्या उबदार मिठींमध्ये
तो असा विरघळून गेला
त्याच्या थंड मिठीमध्ये
तिचा देह शांत झाला

जगावेगळी प्रेमकहाणी
एक क्षणात संपून गेली
वाफ त्यांच्या प्रेमाची,
हवेमध्ये विरून गेली...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

ईश्वर

ईश्वर...

अनंत मी अफाट मी
असीम मी अमाप मी
चराचरात भरूनही
तरी तुला अगम्य मी

शब्दांत मी नि:शब्द मी
पद्यात मी गद्यात मी
क्षय न ज्याचा कल्पांती
असा अक्षय अजर मी

अजोड मी अखंड मी
व्यक्त मी अव्यक्त मी
लक्ष व्योम व्यापले तरी
प्रचंड मी प्रचंड मी...

अमर्त्य मी अगाध मी
सूक्ष्म मी विराट मी
विश्वरूपी विश्वव्यापी ...
चैतन्य मी..चैतन्य मी

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Sunday, 13 January 2019

पझल

पझल

जस दिसतं तसं नसतं
असं वाटतं कधी कधी...
जसं असत तसंच दिसतं
असंही वाटतं कधी कधी....

जसं दिसतं तसं असतच
अस वाटतं कधी कधी...
जसं दिसावं तसंच असावं
असंही वाटत कधी कधी...

जसं असावं तसंच दिसावं
अस वाटतं कधी कधी...
जस नसावं तसं दिसावं
असंही वाटत कधी कधी..

जे असल्यासारखं वाटतं ..
ते नसतचं कधी कधी
जे नाहीच वाटत कधी
तेच असतं कधी कधी ...

असल्यासारखं वाटतं
पण ते नसतं कधी कधी
नसलेलं वाटतं असल्यागत
फसल्यागत होत कधी कधी

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Wednesday, 9 January 2019

लिपस्टिक

तू अशीच छान दिसतेस
मेकअप ची गरजच नाही
डोळ्यात बघ निरखून माझ्या
तुला आरशाची गरजच नाही

इतकी नितळ आहेस ग तू
फेशियल ची गरजच नाही
मोकळे सोडलेस केस पाठीवर
तर स्ट्रेथनिंगची गरजच नाही

भुवया तुझ्या इतक्या रेखीव
आयब्रोची तुला गरजच नाही
डोळे तुझे इतुके जुलमी की
आय-लायनर ची गरजच नाही

सहज चाललीस तरी कॅटवाँक
हायहिल ची तुला गरजच नाही
ओठांत फुलला गुलाब तुझ्या
तुला लिपस्टिकची गरज नाही

खुलून दिसते साडी तुला
जीन्स-टॉप ची गरजच नाही
असताना प्रशांत संगतीला
तुला कुणाची गरजच नाही....

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846/10/01/19

Saturday, 5 January 2019

भावना

मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले
अर्थ तुला कळलेच नाहीत
तुला फक्त आकार कळले

काना मात्रा अन वेलांटी,
शब्द नव्हे फक्त आकार
निर्गुण भावना होतात ग
फक्त शब्दातूनच साकार
शब्दांच्या पलीकडले ,
तुला कधी ना उमगले
मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले...

भावना कधी बोलत नाहीत
शब्दच नेहमी बोलतात...
भावनांचे सप्तरंग घेऊन
फुलंच नेहमी फुलतात..
तुला मात्र फुलांचे ,
ना गंध ना रंग कधी कळले
मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले

तुझे लाईक्स तुझे कमेंट्स
आता मनाला भिडत नाहीत
दिसलीस कधी चुकून तर
काळजात काही हलत नाही
मार्ग तुझे अन माझे,
आता असे वेगळे..
मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले

-प्रशांत शेलटकर
8600583846

Wednesday, 2 January 2019

अंधार

नाती तुटताना...
आवाज होत नाही...
आणि कोणी परकं होताना
कारण मात्र सांगत नाही..

ज्योत विझावी ना,
तशी नाती विझत जातात..
बघता बघता तुम्हालाच
बेदखल करून जातात

विझणारी ती विझून जाते
पण पापण्या भिजवून जाते
काळजात मात्र उरलेसुरले
प्रकाशकण ठेऊन जाते....

मग अंधारच बरा वाटतो
कारण तो खरा असतो
ज्योत विझून गेल्यावर
तोच एक सखा उरतो...

-प्रशांत श शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...