Ad

Saturday, 5 January 2019

भावना

मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले
अर्थ तुला कळलेच नाहीत
तुला फक्त आकार कळले

काना मात्रा अन वेलांटी,
शब्द नव्हे फक्त आकार
निर्गुण भावना होतात ग
फक्त शब्दातूनच साकार
शब्दांच्या पलीकडले ,
तुला कधी ना उमगले
मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले...

भावना कधी बोलत नाहीत
शब्दच नेहमी बोलतात...
भावनांचे सप्तरंग घेऊन
फुलंच नेहमी फुलतात..
तुला मात्र फुलांचे ,
ना गंध ना रंग कधी कळले
मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले

तुझे लाईक्स तुझे कमेंट्स
आता मनाला भिडत नाहीत
दिसलीस कधी चुकून तर
काळजात काही हलत नाही
मार्ग तुझे अन माझे,
आता असे वेगळे..
मी व्यक्त केल्या भावना,
तुला फक्त शब्द कळले

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...