आला पाऊस पाऊस
झालं झिम्माड ग रान
सुखावले रान पक्षी
देती गारव्याची तान...
आला पाऊस पाऊस
थेंब थेंब गाती गाणी
नक्षी थेंबांचीच शोभे
आज माझ्या ग अंगणी
आला पाऊस पाऊस
पागोळ्या झरती झरझर
आभाळाच्या माउलीला
फूटे पाण्याचाच पाझर
आला पाऊस पाऊस
आला गारवा गारवा
पुन्हा सजला धजला...
ऋतू हिरवा हिरवा....
-प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment