Ad

Friday, 21 September 2018

उगाचच

उगाचच जुळले आपले
एकमेकांचे श्वास .....
उगाचच लागला आपला
एकमेकांना ध्यास.....

उगाचच होते तुझे माझ्याकडे
असे अनिमिष पहाणे.....
उगाचच होते माझेही तुझ्यातच
जीव गुंतणे....

उगाचच म्हणायचो आपण
एकमेकांना लव यू....
उगाचच तू म्हणायचीस
पिलू मिस यू.......

उगाचच होती ती तुझी
अनावर मिठी....
उगाचच अश्रूंनी भरली होती
तुझी अनावर दिठी.....

उगाचच तुझ्या ऊनस्पर्शाने
मी उबदार झालो....
उगाचच  तुला उजेड देताना
मी अंधार झालो.....

उगाचच तुझ्या आठवणींचे
गुंते सोडवीत बसलो....
उगाचच तुला आठवताना
विसरायचेच विसरून गेलो...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...