काय चुकले? कसे चुकले?
अजुनी मला उमजेना.....
रंगलेला डाव असा...
का मोडला कळेना....
कधी न केला प्रश्न मी
माझ्याच आयुष्याला..
नियतीचा भोग का
माझ्याच वाट्याला...
सावली दिलीस तू
आता उन्हे का देतेस तू ?
प्रश्नांचे असंख्य डंख ते
का मनास देतेस तू?
सूर्य नको होता ग मला
हवा होता एक कवडसा...
अंधा-या या आयुष्याला
हवा होता एक दिलासा
-प्रशांत
No comments:
Post a Comment