Ad

Monday, 23 July 2018

कसले सरण हे मला लाभले

तुला कधी मी कळलोच नाही
माझा मला मी मिळालोच नाही
कसले सरण हे मला लाभले ?
कधी आतून मी जळलोच नाही

उरी वेदनांची जखम ती ओली
कधी तुला ती दिसलीच नाही
व्यर्थ शब्दांचे केवळ पसारे...
भावना त्यात कधी दिसलीच नाही

दिले तुला सर्व जे होते जवळी
उरे वेदनांची  रात्र काळी काळी
परी वेदना तुला सखे माझी....
तुला कधी ती कळलीच नाही..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

मग मोराने काय करावे?मग मोराचे काय करावे?

मग मोराने काय करावे? मग मोराचे काय करावे? मोर नाचतोय.. प्रेक्षकपण आहेत.. काही समोर..काही मागे.. पण समोरचे मागे आणि मागचे समोर कधीच येत नाहीत...