Ad

Monday 14 May 2018

निरोप

दिगंताच्या प्रवासा...
निघून असे जावे...
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

साथी आपले आपण
हेच एक सत्य....
प्रेम ही माया
जाणोनि हेच नित्य
मार्ग जिवनाचा
असाची क्रमावे
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

जिथे जीव लावावा
तोच जीव घेतो....
दर्द आयुष्याला
तोच तो देतो....
दुःख देणाऱ्यासही
सुख देतंच जावे...
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

कशाला कुणामध्ये
असे गुंतवून घ्यावे...
कशास स्वार्थास
नात्याचे नाव द्यावे
बंधनातून स्वतःच्याच
मोकळे स्वतःला करावे
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

दिगंताच्या प्रवासा...
निघून असे जावे...
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे
-प्रशांत
8600583846

No comments:

Post a Comment

मनातलं-#४

मनातलं -# -4 स्वसंवेद्य.. सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिव...