Ad

Saturday 19 May 2018

ओढ

ओढ तुझीच ग मला
कसं सांगू तुला
जीव तुझ्यातच गुंतला
कसं सांगू तुला...

तू बोलतेस तेव्हा
सतार जणू झंकारते...
तू हसतेस तेव्हा
जणू चांदणे साकारते...
तुझ्या आठवणींचा
मनी झुलतो झुला
ओढ तुझीच ग मला
कसं सांगू तुला
जीव तुझ्यातच गुंतला
कसं सांगू तुला...

कधी वाटते तू ...
गार गार पहाट गारवा
कधी वाटते तू
मनभावन ऋतू हिरवा
तुझ्याच सवे झेलावा ग
ऋतू  चिंब ओला....
ओढ तुझीच ग मला
कसं सांगू तुला
जीव तुझ्यातच गुंतला
कसं सांगू तुला...

-प्रशांत

No comments:

Post a Comment

मनातलं-#४

मनातलं -# -4 स्वसंवेद्य.. सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिव...