नाचू नकोस तू पोरी
तू कशासाठी नाचतेस
हे त्यांना कधीच कळणार नाही
यांच्या कपाळावर पसरेल मात्र
एक उगाच सांस्कृतिक आठी
यांना दिसेल फक्त तुझं
तंग कापड्यातलं शरीर
तुझी जगण्याची जंग ...
कधीच दिसणार नाही..
म्हणून म्हणतो ...
नाचू नकोस तू पोरी
तू कशासाठी नाचतेस
हे त्यांना कधीच कळणार नाही
यांच्या कपाळावर पसरेल मात्र
एक उगाच सांस्कृतिक आठी
कपड्या पलीकडे ...
यांची नजर कधी गेलीच नाही
मूर्ती पलीकडला देव यांना..
कधी दिसलाच नाही...
हे शोधत बसतील ...
तुझ्या कपड्यात अश्लिलतेचे
बीभत्स पुरावे...
म्हणून म्हणतो...
नाचू नकोस तू पोरी
तू कशासाठी नाचतेस
हे त्यांना कधीच कळणार नाही
यांच्या कपाळावर पसरेल मात्र
एक उगाच सांस्कृतिक आठी
यांच्या पुस्तकी जगात...
सारं कसं छान असतं...
तुझ्या माझ्या जगाचं...
यांना कुठे भान असत...
बापाचं काळीज माझं
आतून तुटत जातं...
म्हणून सांगतो...
नाचू नकोस तू पोरी
तू कशासाठी नाचतेस
हे त्यांना कधीच कळणार नाही
यांच्या कपाळावर पसरेल मात्र
एक उगाच सांस्कृतिक आठी
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment