Ad

Sunday 20 May 2018

जगून घे आधी

आठी घालून कपाळाला
जगू नये कधी....
सुतक आल्यागत चेहरा
ठेऊ नये कधी.....

नसेल बँक बॅलन्स...
नसेल दारात गाडी...
घर असेल साधेसुधे
नसेल घराला माडी...
गाडी साठी माडी साठी
रडू नये कधी.....
आठी घालून कपाळाला
जगू नये कधी....

सिक्सपॅक नसुदे बॉडीला
निरोगी असू दे काया....
"सलमान "तुम्ही बायकोचे
तीच तुमची "ऐश्वर्या..."
सुंदर कितीही असली तरी... शेजारणीवर मरू नये कधी...
आठी घालून कपाळाला
जगू नये कधी....

मेल्यावर मी काय होईल
विचार कसला करता...
राजे गेले सम्राट गेले
तुम तो गली का कुत्ता
कोण कोणाच नसतं
ही गोष्ट आहे साधी...
आठी घालून कपाळाला
जगू नये कधी....

माझी बायको माझी मुलं
हे भ्रम आहेत सगळे...
मेल्यावर तुमच्या इस्टेटीचा
हिशेब करतील सगळे...
जगून घ्या आनंदाने...
तुमची "बॉडी" होण्याआधी
आठी घालून कपाळाला
जगू नये कधी....
सुतक आल्यागत चेहरा
ठेऊ नये कधी.....

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

मनातलं-#४

मनातलं -# -4 स्वसंवेद्य.. सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिव...