माझं तिच्यावर प्रेम आहे
तिचंही असावं कदाचित..
वाटतं कधीतरी केव्हातरी
ती बोलेल हे अवचित...
तशी ती रोज दिसते
ऑफिसला जाता येता..
स्टॉप वर उभी राहून
करते मला टाटा टाटा....
ऊन असो वा पाऊस
ती वाट माझी बघते..
कधी जवळ गेलो तर
ती मोहरून जाते...
आज ती सजलीय...
नटून थटून बसलीय
सगळया नगरासाठी
सेलिब्रिटी झालीय...
ती कोण आहे ते ....
कसं सांगू तुम्हाला
पहिली नाही दुसरी नाही
ती आहे तिसरी धर्मशाळा...
No comments:
Post a Comment