ज्या गावाला जायचंच नाही
त्याचा पत्ता विचारुच नये...
जे नातं तोडायचंच आहे
ते कधी जोडूच नये...
दूर जर जायचेच आहे..
तर जवळ कधी येऊच नये..
विझवयाचीच असेल ज्योत जर
ज्योतीला ओंजळ धरूच नये...
सोडायचीच असेल साथ जर
उगाच हात धरु नये.
आणि एकदा धरला हात तर
शेवटपर्यंत सोडूच नये...
बोलायचंच नसेल कुणाशी
तर नजरेनंही बोलूच नये...
कितीही रडलो आतून तरी
डोळ्यात पाणी आणू नये...
डोळे भरले आपले तरी
एक मात्र होऊ नये....
पाणी तिच्या डोळ्यात
देवा कधी येऊच नये...
-प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment