Ad

Sunday, 31 December 2017

सरत्या वर्षाला निरोप देताना

सरत्या वर्षाला निरोप देताना..

आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन क्षणांमधली अखंड धडपड...मग ही धडपड आनंदमय का करू नये...देव आपल्याला वर्ष नावाचं गुलाबाचं फूल देतो...आता गुलाब म्हटले की काटे असायचेच...काट्याशिवाय गुलाब असतं का?..तसेच सरत्या वर्षात काही आठवणी गोड तर  काही कडू असणारच...दोन्ही स्विकारायला हवं...नाती जपायला हवीत..
    नातं कोणतेही असो,नातं तुटणं हे वेदना देणारं असतं...
नाती तुटतात कारण आपण एखाद्याच वागणं चूक आहे की बरोबर एवढच पाहतो...ते नैसर्गिक आहे का ते पहात नाही...नातं कस जपायचं हे उमजलं की आयुष्य म्हणजे सुंदर प्रवास वाटतो...
       सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष उगवतीच्या क्षितीजावर दस्तक देताना एक संकल्प जरूर करुया...
        "एकमेकांना जपुया"
बस्स इतकच....बोलायच होत

....प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...