कोणताही राजकीय पक्ष काही अमरपट्टा घालून जन्माला आलेला नाही 1885 साली जन्मलेली काँग्रेस आता आहे कां? ती कधी काँग्रेस एस झाली तर कधी आय झाली, हिंदू महासभा, फॉरवर्ड ब्लॉक सारखे पक्ष आले कधी आणि गेले कधी कळलं नाही, शेतकरी कामगार पक्ष आज कुठे आहे?
वेळे नुसार राजकीय पक्ष धोरण बदलतात, कारण ते सत्ता संपादन या एकमेव हेतुने जन्म घेतात, हिंदुत्वा चा मुद्दा 90 च्या दशकात भाजप ने उचलून धरला, त्या अगोदर भाजपाचा अजेंडा वेगळा होता, काँग्रेसचा सर्वसमावेशक अजेंडा लोकमान्य टिळकांच्या काळात मुस्लिम धर्जीना झाला, गांधीच्या पूर्व काळात तो कमी झाला उत्तर काळात वाढला. मराठीचा मुद्दा उचलून घेतलेली शिवसेना तत्कालीन काँग्रेस पक्षाने कम्यूनिस्टा ना शह म्हणून वाढू दिली. पुढे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलला..
काळाची गरज म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष अगदी परस्पर विरोधी विचार असलेल्या पक्षाशी युती करत असतो, सत्तर च्या दशकात मा. शरद पवार यांनी केलेला पुलोद चा प्रयोग आठवून पहा त्यात जनसंघ सुद्धा युतीत सामील होता, पवार साहेबांचा राजकीय प्रवास आय काँग्रेस ते समाजवादी काँग्रेस ते पुन्हा आय काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा झालाय.
भाजपचा प्रवास जनसंघ ते भाजप असा झालाच पण तात्विक दृष्टीने फ्रॉम पार्टी विथ डिफ्रन्स टु पार्टी लाईक काँग्रेस असा झालाय. तो तसा झाला नसता तर भाजप ची शे का प झाली असती काय? हा पण एक त्यान्च्या कार्यकर्त्याना छळणारा प्रश्न असू शकतो.
कम्युनिस्ट पक्षाची बेसिक धोरणे एकच असली तरी राजकीय सोयीसाठी त्त्यांचे पण वेगळे गट आहेतच
थोडंक्यात प्रत्येक सुज्ञ माणूस आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी स्वतःच्या आणि इतर राजकीय पक्षाचे इतिहास वाचले पाहिजेत,
त्यामुळं खुपशा राजकीय अंधश्रद्धा कमी होतील.
- प्रशांत
No comments:
Post a Comment