.सापडले....
....त्या जुन्या गोष्टीतले सात आंधळे अखेरीस सापडले..आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी,डावे, उजवे, पुरोगामी आणि प्रतिगामी..हेच ते सात आंधळे..भवतालाच्या हत्तीवर आपल्या आकलनाचे तुंबाड लावीत प्रत्येक जण करत असतो एकमेकांची वैचारिक हजामत...प्रत्येकाचे सेल्फ अटेस्टड परसेप्शन हेच अंतिम सत्य जणू..इटूकल्या त्रिज्येचा पिटुकला परीघ..बुद्धीचा कंपास जितका म्हणून ताणेल तितक त्याचं वर्तुळ..त्या वर्तुळातले त्यांचे त्यांचे कळप..त्यांचे त्यांचे झेंडे..
स्पर्शमितीच्या मर्यादेला पूर्ण सत्याचे आकलन कधीच होत नाही .दृष्टीच नसेल तर दृष्टिकोन तरी कुठून यायला? मग केवळ स्पर्शातून उमगलेला हत्ती खांबासारखा,सुपासारखा जाणवला तर त्यात नवल नाहीच..आणि सात आंधळे एकत्र आले तरी एकाच स्पर्श मितीत फिरत रहातील नाही का?....जेवढी त्रिज्या तेवढं वर्तुळ..
-© प्रशांत
No comments:
Post a Comment