कळत- नकळत
आपल्याला काही कळत नाही..हे ज्याला कळलं त्याला खरंच सगळं कळलं..ज्यांना वाटतं सगळं त्यांनाच कळतं ..त्याना खरं तर काहीच कळलेल नसतं..
हे जे लिहिलंय ते जरी कळलं तरी ,काहीतरी कळलंय अस समजायला हरकत नाही..काही माणसं कळलेलं नसताना कळलं असं का दाखवतात ते नकळे.. कदाचित याला काही कळत नाही अस लोकांना कळलं तर?? अशी भीती त्याना वाटत असावी..पण ज्या गोष्टी कळत नाहीत त्या कळून घेण्याची कळकळ असावी लागते मनात..आपल्या मनातील कळ दुसऱ्याला कळावी आणि दुसऱ्याच्या मनातली कळ आपल्याला कळावी अशी कळकळ असणे वाईट नाही कळकळ असावी पण कळ लावू नये.आणि कोणाच्या कळीत पण जाऊ नये..
तुमच्या विषयी कळकळ वाटते म्हणून ही सगळी कळवाकळवी...
कळावे..
आपलाच
-किंचित कळलेला प्रशांत
No comments:
Post a Comment