कौशल्यम सर्वत्र पुज्यते...
ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..
बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक समजाला छेद देणारे हे वाक्य आहे..शालेय जीवनापासून ते आज पर्यंत " तुला मार्क्स किती मिळाले?" या प्रश्नाच्या उत्तराभोवती आपल्या बुद्धिमत्तेच्या कल्पना फिरत राहिल्या आहेत.
बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार आहेत पण त्यापैकी भाषिक, गणिती आणि तर्कशास्त्रीय बुद्धिमत्तेभोवती सगळी एज्युकेशन सिस्टम फिरत राहिल्याने इतर बुद्धीमत्ता या बुद्धिमत्ताच नाहीत.अशा कल्पना समाजात अजूनही आहेत.आता मात्र ज्ञानरचनावाद सारखे नाविन्यपूर्ण बदल आपल्या शैक्षणिक धोरणात होत आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
बुद्धिमत्तेची प्रत्येक शेड वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळी असते. डिमांड आणि सप्लाय च्या लॉ नुसार त्यात बदल होत असतात..सायन्स शाखेला पूर्वी आणि आजही महत्व आहे पण पूर्वी कॉमर्स शाखा तितकीशी लोकप्रिय नव्हती. "मध्यममार्की" विद्यार्थी कॉमर्स शाखेत प्रवेश घेत. पण आता इ-कॉमर्स मुळे कॉमर्स स्ट्रीम चे महत्व वाढले आहे. स्पेसिफिक स्किलला सुद्धा खूप डिमांड आहे.सोशल सायन्स मध्ये पदवी घेऊन तरुणांना एन. जी.ओ मध्ये लाखाचे पॅकेज मिळत आहे.
शारीरिक गुणवत्तेला पण खूप महत्व आले आहे. सगळेच बौद्धिक कौशल्याच्या मागे लागल्या मुळे जिथे शारीरिक कौशल्य लागते अश्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याने तिथे डिमांड वाढली आहे. आज मजुरीचे दर वाढले आहेत. ते हया माझ्या माहितीतले एक उदाहरण.. आमच्या ऑफिस मध्ये साफ सफाई करणारी बाई सकाळी 7 पासून दुपारी तीन पर्यंत वेगवेगळया सरकारी कार्यालयांत आणि घरात साफसफाई करणारी बाई महिन्याकाठी 30000 कमावते. त्यात सरकारी कार्यालयाना ज्या सुट्ट्या लागू असतात त्या तिलाही लागू..
केवळ जेवण करून देणाऱ्या महिलाही हजारोच्या पटीत कमवतात.पंक्चरवाले एका पंक्चरचे 100 रुपये घेतात.मुंबईत एक तरुण आहे तो श्रीमंतांच्या घरचे कुत्रे रोज तासभर फिरवून आणायचे महिन्याला दहाहजार घेतो.त्याचे महिन्याचे उत्पन्न एक लाखाच्या घरात आहे. केवळ बुद्धिमत्ता आणि कौशल्य असून चालत नाही. दुर्मिळता खूप मॅटर करते..
कौशल्य हा एक महत्वाचा फॅक्टर राहिला आहे. कौशल्य म्हणजे बुद्धिमतेने लिहिलेला एक छोटासा प्रोग्राम असतो. वेळोवेळी त्यात अपडेशन केलं की माणूस स्पर्धेत टिकून राहतो.कौशल्य बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे असते. एसी मध्ये एका जागेवर तासनतास स्क्रीन वर डोळे ठेवून मेंदूला कामाला लावणारे आयटीयन्स आणि चाळीस/पंचे चाळीस डिग्रीत रस्त्यावर आणि शेतात काम करणारे मजूर यांच्या स्किल मध्ये फरक फक्त बौद्धिक आणि शारीरिक स्किलचा..बाकी गुणवत्ता एकच.
समाजासाठी सगळे एकमेकांना पूरक असतात. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असे काही नसते. माणसाने " स्व" सुखावण्या साठी अशा आभासी उतरंडी रचल्या आहेत ..बस्स एवढंच..
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment