Ad

Sunday, 21 July 2024

तनाचे श्लोक..

तनाचे श्लोक..🤣

तना सज्जना त्त्वां
पाऊल जपून टाकावे
अन्यथा नकळत पुढे
स्वमुखावर आदळावे

तना सज्जना बघ जरा
अंगणात फरशी निसरडी
चालताना अखंड असावे
सावचित्त हरघडी..

तना सज्जना
सरकता हे किंचित पाय
थेट आदळतात कुल्ले
आठवते मग माय

तना सज्जना
पाऊस खिडकीतून पहा रे
उगा प्रत्यक्ष भिजण्याचा
वृथा शौक नको रे..

तना सज्जना,
उसने तारुण्य नको रे
अन उरलेल्या दिवसात
उगा कारुण्य नको रे

तना सज्जना
राम घरात बसून म्हणा रे
अवेळी अकाली 
रामनाम सत्य नको रे

-प्रशांत

🤣🤣

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...