किंचित ज्ञान ..उदंड अज्ञान...☺️
1 +1 = 2 गणिती उत्तर
1+ 1 = 1 जैविक उत्तर
1 + 1 = 0 अध्यात्मिक उत्तर
खुलासा- 1 या संख्येत 1 ही संख्या मिळवली तर 2 उत्तर येते हे गणिती उत्तर
1 स्त्री आणि 1 पुरुष एकत्र आले तर मूल जन्माला येते हे जैविक उत्तर
जीव शिवस्वरूपात विलीन झाला की शून्यावस्था येते हे झाले अध्यात्मिक उत्तर ...
☺️☺️☺️☺️☺️
ज्याच्या त्याच्या मिती आणि मतीनुसार
तिन्ही उत्तरे बरोबर ..मानवी इंद्रियगम्य जाणिवांच्या पलीकडे काही असते.याला सर्वमान्य पुरावा नाही. आणि जोपर्यंत पुरावा नाही तो पर्यंत विज्ञान त्याला मान्य करत नाही. हे विज्ञानाच्या विशिष्ट मितीमध्ये सत्यच आहे.
मेंदूच्या सद्यस्थितीतील प्रगतीच्या अंगाने विचार केला तर जेवढे आकलन होते आणि जेवढे सिद्ध होते तेच सत्य हे बरोबर...भूतकाळात आदिम अवस्थेत मेंदूचा विकास जितका होता तितकेच त्याचे आकलन ,तितकीच त्याने मान्य केलेली तथ्ये ,काढलेले निष्कर्ष हे सारे आदिम अवस्थेतील मेंदूच्या दृष्टीने विज्ञानच होते.
जशी मेंदूची प्रगती होत गेली तशी त्याचे भवतालाचे आकलन बदलत गेले ते अधिक सखोल सविस्तर आणि त्याच वेळी सूक्ष्म होत गेले. जुनी तत्वे ,निष्कर्ष बाद होत गेले नवीन प्रस्थापित होत गेले.
गंमत आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे उत्क्रांती अजूनही होत आहे. मेंदू अजून डेव्हलप होतोय. त्यामुळे जुन्याची पडझड होऊन नवीन निर्मिती होणारच..जुने म्हणजे केवळ धार्मिक ,अध्यात्मिक नव्हे , विज्ञान देखील बदलत रहाणार.
मला सगळे कळते हे जर अध्यात्म म्हणत असेल आणि आपल्या मती आणि मितीनुसार ते चूक असेल तर विज्ञानालाही असे म्हणता येणार नाही की विज्ञानालाच सगळे कळते. जिना चढताना पायाखालची पायरी सोडल्याशिवाय वरची पायरी गाठता येत नाही तसेच आधीची मांडणी कितीही तर्कशुद्ध असो उत्क्रांती ती खोटी तरी ठरवते अथवा जुनी तरी ठरवते..काळाच्या ओघात बदलाची गती वाढत जातेय..आजचे शहाणे कालच्याना मूर्ख ठरवतात ..कदाचित उद्याचे शहाणे आजच्या शहाण्यांना मूर्ख ठरवतील..😊
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment