बोधिसत्व कथा # 9
एका प्रसिद्ध झेन गुरुकडे एक तरुण युद्धकला शिकत असतो. तो तरुण इतर विद्यार्थ्यासोबत मैदानात रोज सराव करत असतो. एक दिवस गुरुंच्या लक्षात येत की त्या तरुणाच्या तंत्रात इतर विद्यार्थी सतत अडचणी निर्माण करीत आहेत. त्या तरुणाचे नैराश्य लक्षात घेऊन गुरूने त्याच्या जवळ जात त्याला विचारले काय अडचण आहे? तो तरुण म्हणाला " मी माझे तंत्र वापरू शकत नाहीये.. मला समजत नाहीये काय अडचण आहे... गुरू म्हणाले "त्याच कारण तुला एकतानता समजली नाहीये.., चल माझ्या बरोबर..
तरुण शिष्य गुरूंच्या मागे निघाला..थोड्याच अंतरावर जंगल होते ,त्या जंगलात ओहोळ वहात होता तिथे ते आले..थोडा वेळ तिथे उभे राहिल्यावर गुरू म्हणाले "त्या वाहत्या पाण्याकडे बघ, ते दगडांना ,खडकांना मारत नाहीये, विरोध करत नाहीये, आणि निराश होऊन थांबत नाहीये.. तर त्याच्या आजूबाजूने वहात सतत प्रवाहित होतंय या पाण्यासारखा हो, तुला एकतानता म्हणजे काय ते कळेल...
तो तरुण काय समजायचे ते समजला ..लवकरच तो पाण्यासारखा झाला . नंतर त्याला सरावात त्याचे तंत्र दाखवण्या पासून कोणीच रोखू शकले नाही..
💡- अडथळ्याशिवाय आयुष्य नाही ..आणि त्याशिवाय मजा नाही.. आयुष्यात चॅलेंज नसेल तर आयुष्य बेचव होईल..जीवनाच्या क्रिझ वर बॅटिंग करताना संकटांचे बाऊन्सर येणारच आहेत, फसव्या गुगलीचा सामना करावा लागतोच..संकटाचा चेंडू यॉर्कर आहे, इनस्विंगर आहे, की आऊट स्विंगर आहे हे ओळखावं लागतं.. हे सर्व करताना बाजूचे क्षेत्ररक्षक काही तुमचे कौतुक करत नसतात त्यांचे स्लेजिंग चालूच असत..
आयुष्याचा डाव तुम्हालाच खेळावा लागतो ..आयुष्य कधी सजवावे लागते तर कधी सावरावे लागते.. तुमच्या प्रगतीने सुखावणारे खूपच थोडे असतात..जळणारे ,अडथळे आणणारे, गोड बोलून काटा काढणारे जास्त असतात..
त्यांना उत्तरे देत आपली एनर्जी फुकट घालवायची नाही..उद्या हीच लोकं तुमचं शतक झाल्यावर अभिनंदन करायला येतात... तो पर्यंत आपली एकतानता सोडून नये ..खेळत रहायच...😊
अत्त दीप भव
😊-प्रशांत
No comments:
Post a Comment