Ad

Monday, 30 October 2023

प्रवास..

प्रवास...

नाते असले म्हणून काय झाले
त्याला एक्सपायर डेट असतेच
कुठे ना कुठे...कधी ना कधी
ते नक्की संपणार असतेच..

कितीही ओंजळ धरा
जे विझायचे ते विझतेच
ज्याला जायचेच असते ना
ते कधी ना कधी जातेच

जे कधीच ना होते आपले
फक्त आपलेपणाचा भास
निसटून गेलेल्या क्षणांचा
मग लागून बसतो ध्यास

आरंभा सोबत अंताचाही
प्रवास चालू  निरंतर
म्हणूनच पडत जाते
नात्यामध्ये सतत अंतर

डोळे भरून आले तर
पापण्या फक्त मिटाव्यात
मनातल्या ओल्या भावना
मनातच  असू द्याव्यात

समजून जावे आपल्याला
कसले आणि किती मोल
बीजच नाही जिथे जराही
तिथे काय असून ओल ?

कठोर असला कितीही
 तरीअनुभव हाच गुरू
मागच्या पानावरून पुढे
प्रवास मात्र रहातो सुरू

~© प्रशांत 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...