सिम्पल लॉजिक..
अंदमानात दोन प्रकारचे कैदी पाठवले जात ...एक... अट्टल गुन्हेगार आणि दोन..मोस्ट डेंजरस राजकीय कैदी.. सावरकर अट्टल गुन्हेगार नव्हते ते राजकीय कैदी होते.मुळात अंदमानात राजकीय कैदी म्हणून पाठवले जाणे हाच देशभक्तीचा अस्सल पुरावा मानायला हरकत नाही.
बाकी लॉजिकल विचार केला तर निरंजन टकले यांनी जे मांडले आहे ते पटत जाते. ते बेडयांचा आवाज करून संवाद साधणे वगैरे..ही जर संवाद पद्धती असेल तर इतर राजकीय कैद्यांनी जे लिहिलं आहे त्यात त्याचा उल्लेख असनायला हवा होता.आता त्याचा प्रतिवाद काय होतो हे बघणे इंटरेस्टिंग ठरेल..
महात्मा गांधींपासून सावरकरांपर्यन्त यांनी कुठेतरी आपलं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेऊन देशा साठी त्याग केलाय. आज सत्तर वर्षानंतर त्यांचेविषयी अनेक प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे .त्या माहितीचा लॉजीकली विचार केला जातोय ..गोष्ट चांगली आहे ..भाबडेपणे विचार करण्यापेक्षा वस्तुनिष्ठ विचार करणे केव्हाही चांगले ..पण एकदम टोक गाठून त्याना अरे तुरे करणे कधीच पटणार नाही. सावरकर या या ठिकाणी चुकीचे वागले आणि या या ठिकाणी बरोबर वागले.किंवा महात्मा गांधीची ही धोरणे चुकीची होती पण ही धोरणे योग्य होती ...अशी मांडणी ही विवेकाची असते.
आपल्या व्यक्तिगत जीवनात देखील आपण काही ठिकाणी चुकतो काही ठिकाणी बरोबर असतो. सार्वजनिक व्यक्तिमत्वांना देवत्व दिले जाते हा आपला खास भारतीय गुण आहे.आणि म्हणून त्याचा मानस शास्त्रीय इफेक्ट म्हणून कोणालातरी खलनायक केले जातेच..आपण चांगल्यातले वाईट हायलाईट करतो आणि वाईटातले चांगले हायलाईट करतो.चांगले वाईट सम बुद्धीने पाहिले पाहिजे.
-प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment