Ad

Saturday, 13 May 2023

सकाळी सकाळी...

सकाळी ..सकाळी..

उठ आता सखी
बघ किती उजाडले
सोड ही मिठी
पक्षी दिगंती उडाले

शोध तुझी टिकली
बघ कुठे हरवली
अरे ही बघ ना इथे
अशी कशी चिकटली

कुठे कुठे काय पडले
संगती जरा लाव ना
ऐनवेळी महत्वाचे तुला
कधी काही सापडेना

विस्कटलेले केस तुझे
बांध मस्त ग  पोनी
बांधताना तु दिसतेस
तू किती सौन्दर्य खनी

बांधताना केस मोकळे
तू गालातच हसशील
का हसतेस म्हणून तुला
मी विचारून ग पाहीन

चल, मला जाऊदे
तू उगाच म्हणशील
अन थोडे नखरे करून
पुन्हा मिठीत येशील

रोज सकाळ लांबतेच
आज अजून लांबेल जरा
जुमानशील ना जराही तू
वाढत्या उन्हाचा पहारा

☺️ -प्रशांत

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...