Ad

Friday, 5 May 2023

गरीब बिच्चारे अँडम

कपाचा धरतात कान
जपून धरतात बशी
कप बिचारा लांबच
बशी मात्र ओठांशी

राखण करतो कुत्रा
तरी तो उभा दारात
बिनकामाची मनीमाऊ
ताणून देते सोफ्यात

गातो बिचारा कोकीळ
भाव खाते कोकिळा
बंद करून पोपटाला
बाहेरून लावतात टाळा

अपघात होता तिचा
सगळे होती गोळा
तो पडता रस्त्यावर
कोणा ना त्याचा लळा

फडफडता किंचित पणती
ओंजळ धरती त्वरे
धुरकट जळतो कंदील बिचारा
त्यास न कोणी विचारे

बैल राबतो शेतात अखंड
त्यास न म्हणे कोणी पिता
जन्म नाही दिला गाईने
तीला मात्र म्हणती माता

काय करावे आता बरे
पुरुष जन्मच हो व्यर्थ
कौतुक जराही नसते
कितीही करा हो  शर्थ

*************

विनोदी हे काव्य म्हणोनी
समजून घ्यावे स्त्रीवर्गाने
परजून शब्दांचे भाले
कुणी न यावे अतीत्वरेने

-प्रशांत शेलटकर
 8600583836

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...