अन काळजात दिवे लागले
काय झाले आज सखी मला
मजला मुळीच कळले नाही
रुतले किती काळजात काटे
हे तुजला मुळी कळले नाही
थबकलो मी जिथल्या तिथे
तू दिसली सूर्यास्त पाहताना
आणि तुला तसे पाहताना
भान मला काहीच उरले नाही
विहरतो मुक्त केशसंभार हा
बटा खेळती गालावरी
कसे सावरावे ओढणीला त्या
ते तुला कळलेच नाही
पाय रुतवुन वाळूत उभी तू
काळजात रुतून का बसते?
प्रश्नाचे उत्तर जीवघेणे
मला कधी गवसले नाही
सूर्य गेला बघ अस्ताचली
भवताल बघ ना अंधारला
अंधार जरी दाटला भोवती
काळजात बघ दिवे लागले
- @शांतप्रज्ञ
No comments:
Post a Comment