राधे....
नियतीचे काटेकोर हिशेब
कधी कोणाला कळत नाही
पुढच्या पानावर काय आहे
तिच्याशिवाय कळत नाही
जे क्षणभर मिळालं
ते आभाळभर समजायचे
काळजाच्या पुस्तकात
चाफ्यागत जपायचं..
बाकी सगळंच बघ सखे
नशिबावर सोडायच
जे मिळाल तेच बघ
फक्त आपलं म्हणायचं
अफाट प्रेम अफाट राग
तुझ्याशिवाय कोण करेल.
मनातल्या मनात सांग बरे
तुझ्या शिवाय कोण कुढेल?
जे झालं ते झालं जाऊ दे ग
दैवगतीच तशी होती
उन्हाळेच जास्त नशिबात
श्रावण सर कमीच होती
सगळी निमित्तं असतात
नियतीच बघ सर्व ठरवते...
कृष्ण पैलतीरावर अन
राधा ऐलतीरावरच रहाते
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment