प्रौढ वयातल्या प्रेमकहाण्या दाखवायचा सोनी आणि झी चा ट्रेंड दिसतोय.."अजूनही बरसात" नंतर , आता सोनी वर "तू तेव्हा तशी " येतेय..समाजात जे घडत ते माध्यमात दिसत ? की माध्यमात दिसत ते समाजात घडतं हा कोंबडी आधी की अंडा आधी या प्रश्नासारखाच अनुत्तरित.. पण जाऊदे ..या सीरियल बघून घरोघरीच्या ओंडक्यांना प्रेमाची पालवी फुटण्याची शक्यता आहे.. कधी कुठे जुनी "ओळख " भेटलीच तर "अजूनही बरसात आहे" म्हणून लगेच "माझी तुझी रेशीमगाठ " बांधायला जाऊ नका ..नाहीतर घरची म्हणायची " येऊ तशी कशी मी नांदायला"
बाय द वे...मालिका बघताना जीव एकाच वेळी हुळहुळतो आणि हळहळतोही..हे वय म्हणजे नरसिंहाच्या मांडीवरचा हिरण्यकश्यपू..धड दिवस नाही धड रात्र नाही,धड आकाशात नाही की धड जमिनीवर नाही..तसच धड तरुण नाही धड म्हातारे नाही..दिवा विझताना मोठा होतो म्हणतात ..हे सीरियल वाले तेल घालू घालू वात मोठी करून घरोघरी विझू घातलेले दिवे (की दिवटे??) "पेटवतायत ." अरे कुठे फेडाल ही पापं...? अशी कुटुंबाच्या कुटुंब "वयात" आली तर " जेवलीस का? हा राष्ट्रीय प्रश्न घोषित करायला हरकत नाही...
च्या मायला हे सीरियल वाले म्हातारे होऊच देत नाहीत...
--© शेलटकरांचा प्रशांत
86 00 58 38 46
No comments:
Post a Comment