Ad

Thursday, 13 January 2022

बोलू आनंदे...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बोलू आनंदे.....

गोड बोलूया पण सत्य बोलूया
मागून नको पुढ्यात बोलूया
टोमणे नकोच ते थेट बोलूया
रडत रडत नको हसत बोलूया

कौतुकाचे चार शब्द बोलूया
शिव्या शाप अभद्र टाळूया
डोळ्यात थेट पाहून बोलूया
वेळ पाहून ना खेळ मांडुया

नेमके , स्पष्ट, प्रभावी बोलूया
कुजकट हलकट शब्द टाळूया
जिभेवर नेहमी साखर ठेवूया
अन डोक्यावरती बर्फ ठेवूया

नित्य शुभंकर मंगल बोलूया
पर कल्याणाचे बोल बोलूया
वैखरी आपुली शुद्ध करूया
 संक्रांतीला संकल्प करूया

शुभम भवतु....🍁🍁🍁

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...