Ad

Sunday, 9 January 2022

लाडकी

लाडकी....

इतकीही छान दिसू नकोस ग
दर्पणही होईल तुझ्यावर फिदा
लिपस्टिकही किती लोचट ग
ओठांवर फिरते कित्येकदा..

वाटते व्हावे कंगवा हस्तिदंती
अन केसात तुझ्या गुंतून पडावे
वाटते कधी व्हावे बिंदी अन
भाळावर तुझ्या मिरवीत बसावे

कधी वाटते मला स्वतःला
 रसरशीत सफरचंद व्हावे
व्रण तुझ्या शुभ्र दातांचे
अंगोपांगी सहर्षे मिरवावे

नथ तुझी व्हावे का?
नको नकोच ग कधी
फक्त सणावरी मिरवणे
नको नकोच कधी

होईन चमकी  छानशी
ते एक असते बरे..
सहवास लाभतो नित्य
हे एक गोड सत्य खरे..

होईन मी एक मस्त चाप
सांभाळीन तव केशसांभारा
हलकेच धरून ठेवीन मी
जर  माळलास कधी गजरा

जरी सखे लाडकी तू
लाडिकपणा पुरे आता
इतकी सजू नको ग
जीवच जाईल आता माझा

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...