रात्र...
एका उदास ओल्या पहाटेस
ती रात्र व्याकुळ झालेली !!
विनवते बिचारी त्या चंद्रास,
काय वेड्या माझी चूक झाली ?
इतका दूर जाऊ नको रे,
थिजली रे गात्र सारी !!
इतका अनोळखी होऊ नको रे,
हरवते ओळख रे माझी !!
काळोख घेऊन उशाला,
मी ढाळते रे आसवे !!
वाटते मला रे नेहमीच
माझ्या मिठीत तू असावे !!
पण काय रे माझ्या चांदूल्या
कसा अनोळखी रे झाला !!
घेऊन चांदण्यांचा पसारा
तू पार क्षितिजापल्याड गेला !!
समजत नाही का रे तुला
मी टाकते उदास उसासे !!
असे कसे रे नियतीचे
उलटेच पडती फासे!!
मग दवाच्या आसवांनी
रात्र एकटीच मौन रडली !!
मग लागता चाहूल दिवसाची
उजेडात ती विरून गेली !!
.
.
.
जो करतो सच्ची प्रीती
वंचनाच त्याचेच प्राक्तनी !!
सोडून जातोच नेहमी चंद्र
रात्र मात्र त्याचीच दिवाणी !!
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment