Ad

Saturday, 5 June 2021

पाऊस कोणासारखा?

पाऊस कोणासारखा?


पाऊस कोणासारखा?
ज्याच्या त्याच्या मनासारखा...

पाऊस....
कुणासाठी फक्त चिखल उगाच
कुणाला दिसेल त्यात मोराचा नाच

पाऊस...
कुणासाठी फक्त पडते पाणी
कुणासाठी मस्त पाऊस गाणी

पाऊस...
कुणासाठी नुसता वैताग अडचण
कुणासाठी मात्र हळवे कातर क्षण

पाऊस...

कोणी म्हणती ही नसती व्याधी
कुणाला लागेल त्यातही समाधी

पाऊस....
कुणासाठी वादळ,वारा, मच्छर
कुणासाठी दरवळे मातीतून अत्तर

पाऊस...
कुणी म्हणते फार गडगडते आज
कुणी म्हणे मेघमल्हार ऐकू आज

पाऊस..
कुणासाठी मिट्ट  उदास अंधार
कुणी म्हणे आज थेंब थेंब गंधार


पाऊस कोणासारखा?
ज्याच्या त्याच्या मनासारखा...


✍️
-प्रशांत शशिकांत शेलटकर
 मु.पो.गोळप, रत्नागिरी
 06/06/2021
 8600 58 38 46

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...