Ad

Sunday, 23 May 2021

झाकोळ

झाकोळ

अशी कशी कोमात गेली ही माणसे
हरवली कुठेतरी ती जिवंत माणसे

मरणभयात थंडगार झाली माणसे
थडग्यात जिवंत गाडलेली माणसे

स्पर्श आप्तांचे टाळणारी माणसे
अशीच  बेवारस जळणारी माणसे

घराघरांत अशी कोंडलेली माणसे
भयबंधनात घट्ट बांधलेली माणसे

मसणवटीत  जळती उदंड माणसे
जिवंत का म्हणावी जिवंत ही माणसे

 झुगारून  झाकोळ देतील ही माणसे
पुन्हा राखेतून रुजतील ही माणसे

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...