तर हसतमुखाने जा
निरर्थक प्रश्नांच्या फैरीला
माझ्याकडे उत्तर नाही..
जायचंच असेल जर तुला
तर क्लेश घेऊन जाऊ नकोस
आनंदाच्या काही सरीअजून
बरसायच्या राहून गेल्या आहेत
जायचंच असेल जर तुला
तर ओझं घेऊन जाऊ नकोस
किमान माझ्या आठवणी
माझ्याकडेच सोडून जा
जायचंच असेल जर तुला
मागे वळून सुद्धा पाहू नकोस
मागे मी असेन नसेन
माझं मलाच माहीत नाही
जायचंच असेल जर तुला
तर मनाची पाटी पुसून जा
पाटीवरची अगम्य लिपी
निरर्थक आहे आता तुझ्यासाठी
जायचंच असेल जर तुला
श्वास थोडे ठेऊन जा
अगदीच प्राण कंठाशी आले
तर जवळ असलेले बरे....
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment