Ad

Monday, 12 April 2021

जिथे....

जिथे मुद्दलच नाही
तिथे व्याज कुठून
जिथे  सागर नाही
तिथे गाज कुठून

जिथे चंद्रच नाही
तिथे पौर्णिमा कुठून
जिथे इंद्रच नाही
तिथे अप्सरा कुठून

जिथे चंदनच नाही
तिथे गंध कुठून
जिथे वळीव नाही
तिथे मृदगंध कुठून

जिथे उत्पत्तीच नाही
तिथे लय कुठून
जिथे संपत्तीच नाही
तिथे भय कुठून

जिथे स्वरच नाही
तिथे गीत कुठून
जिथे मनच नाही
तिथे मनमित कुठून

जिथे कान्हाच नाही
तिथे पान्हा कुठून
जिथे हिरकणीच नाही
तिथे तान्हा कुठून

जिथे तू नाहीस 
तिथे मी कुठून
जिथे मीच नाही
तिथे तू कुठून

-प्रशांत शेलटकर
 8600583846


No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...