Ad

Monday, 8 March 2021

अप्रेषित

तुझ्या कौतुकाचा मुळी
हव्यास मज नाही
नजरेत तुझ्या असावे 
प्रयास मुळीच नाही..

जसा आहे तसाच ना
दिसावा मी तुला..
नजरेत तुझ्या राहण्याचा
अट्टाहास मुळीच नाही

उगा कौतूकाचे सोहळे
तू नको करू कधी
मज नावाजावे लोकांनी
सायास मुळीच नाही

तक्रार करून जगाची
मी काय साध्य करावे
मज लोकांच्या वागण्याचा
अदमास मुळीच नाही..

जावे सुळावर एकदाच
जे प्रेषित म्हणून आले
रोज जातो सुळी मी
क्लेश मुळीच नाही

/-प्रशांत शेलटकर
 8600583846





No comments:

Post a Comment

तीची डायरी

... तो गेल्यावर... तिची काळजी घेणारे खूपच.. घरातल्यापेक्षा बाहेरचेच जास्त.. घरात ती ओझे झालेली... तरी एक बरं आहे.. ती आहे स्वतःच्या पायावर उ...