शब्दांची पण गंमत असते...काही वेळा बोलताना आपल्याला सांगायचे असते एक आणि आपण शब्द मात्र बरोबर उलटअर्थी वापरतो.. उदा. "ही गोष्ट माझ्या "अपरोक्ष" झाली त्यामुळे मला माहित नाही" आता यात सांगणाऱ्याला अस सांगायच आहे की ही गोष्ट मी तिथे उपस्थित नसताना झाली. आता अपरोक्ष चा अर्थ बघूयात, अपरोक्ष हे परोक्षचे विरुद्धार्थी रूप आहे. पर+अक्ष = परोक्ष , पर म्हणजे परका आणि अक्ष म्हणजे डोळा , परक्याच्या डोळ्यासमोर घडलेली घटना म्हणजे परोक्ष.अपरोक्ष म्हणजे परक्याच्या नव्हे तर स्वतःच्या डोळ्यासमोर घडलेली घटना.. पण काळाच्या ओघात आपण चुकीचे शब्द वापरतो...सहज म्हणून जातो माझ्या या गोष्टी माझ्या अपरोक्ष झाल्या... ☺️☺️☺️☺️
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment