तेच
तेच मेसेज
तोच कोरोना
त्याच व्यथा
तीच दैना
तेच gm
तेच tc
तेच bye
तेच gn
तेच विनोद
तेच राजकारण
तीच खाज
तेच गजकरण
तीच वाफ
तीच मल्टी व्हिटॅमिन
तेच लिंबू
तेच सॅनिटायझरेशन
त्याच बातम्या
तेच मथळे
तेच ते टेस्टिंग
तेच ते सापळे
तेच सत्ताधारी
तेच विरोधक
तीच समर्थने
तेच आरोप
त्याचं मॉडेल
तेच लांब केस
तेच दात आणि
तोच फेस
तीच सकाळ
तीच दुपार
तोच दिवस
तीच संध्याकाळ
सगळं काही
तेच ते तेच ते
काल उद्या परवा
तेच ते तेच ते
-प्रशांत शेलटकर
8600583846
बुधवार, 9.45 pm
23/09/2020
No comments:
Post a Comment