हस ना जराशी....
डोळ्यांच्या कोनातून
बोल ना जराशी
हलकेच मनातून...
विस्कटलेले केस
सावरू नकोस ना
ओलेते केस तुझे
ओलेच राहू दे ना
थेंब तुझ्या ओठांवर
तसेच ओघळू दे ना
ओठांनी माझ्या ग
त्यांना टिपू दे ना...
मिठीत अलवार माझ्या
देह तुझा विसावू दे ना
अन तुझ्या श्वासांचीच
सुरेल कविता होऊ दे ना
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment