बीझी
खूप खूप बीझी मी
जरा उसंत नाही
जे काही चाललंय ते
मला मुळीच पसंत नाही
रिया गेली जेलमध्ये
मला झोप नाही
कंगनाच्या बोलण्याला
जरा म्हणून थोप नाही..
ट्रम्पतात्याचं निवडणुकीत
आता काय होणार?
किम जोंग मेला की जिवंत
मला कस कळणार?
जिनपिंगचं थोबाड बघून
पित्त माझं उसळतं
इम्रानमियाकडे बघून
चित्त माझं खवळत
गाढा अभ्यास माझा
कुणी सल्ला घेईना
पी एम जाऊ द्याहो
सी एम सुद्धा ऐकेना
लोकांचं जाउद्या हो
तुम्हाला म्हणून सांगतो
बायकोही विचारत नाही
जीव तीळ तीळ तुटतो
म्हणे मरो तुमचा जीडीपी
भाजीचा भाव सांगा..
सिलेंडर संपला कधीच
आधी नंबर लावा...
राजकारण चुलीत घालूनही
अन्न शिजणार नाही..
सल्ले देता फुकटचे
माझ्याशिवाय ऐकणार नाही
कदर माझ्या लायकीची
ती कशी करणार
आंतरराष्ट्रीय घडामोडी
तिला कशा कळणार
जाऊद्या तीच हो
तिला कधी कळणार नाही
नवरा किती बुद्धिमान
तिला कधी उमजणार नाही
लोक किती वेडे ना
नोकरी धंदा करतात
वेडेच आहेत ते
अस कधी करतात?
फेसबुकवर टाकाव्यात
वेगवेगळ्या पोस्टीं
दिवस रात्री अखंड कराव्या
राजकारणाच्याच गोष्टी
न जाणो तुम्हालाही
भारतरत्न मिळून जाईल
गेलाबाजार कुणीतरी
रस्त्यामध्ये ओळख तरी देईल
म्हणून मला आजकाल
झोप लागत नाही...
जे काही चाललंय ते
मला मुळीच पसंत नाही
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
13/09/2020
6.05 am